जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात सभा सुरु आहे. भाजपचे आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार याठिकाणी उपस्थित आहेत. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी गेल्या पाच वर्षात शहरातील रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लावले. महानगर पालिकेला कर्जाच्या विळख्यातून मुक्त केले, समांतर रस्ता, शिवाजीनगर, पिंप्राळा पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी ठरल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. शहरात ११०० कोटींची कामे झाल्याने आनंद असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. पक्षाने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्याबद्दल आभारी असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.