पुणे – शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध्य धंद्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. येरवडा, विश्रांतवाडी, भोसरी, विश्रामबाग, कोरेगाव पार्क, वानवडी या परिसरातील मटका अड्डे, जुगार, हुक्का पार्लर, लॉटरी तसेच हातभट्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर, सेक्स रॅकेटचेही प्रकरणे बाहेर आले आहेत. दरम्यान अचानक आणि एकाच वेळी इतक्या कारवाई झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकी रोडवर गुंड्या उर्फ सुरज माचरेकर हा हस्तकाद्वारे मटका घेत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी येथे छापा टाकून मनोज सुरेश साळुंके (वय 32) याला जुगार घेताना पकडले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक शौच्छालयाजवळील सुरु असलेल्या मटका अड्यावर छापा टाकला आहे. यामध्ये घेणारे कुमार जनार्दन सोनावणे (35) व विल्सन वसंत कानडे (वय 29) तसेच खेळणारे सिकंदर पापासिंग घमंडे (वय 39), आयुब महमद शेख (वय 48) पकडण्यात आले आहेत. याठिकाणावरुन अडीच हजार रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले असून, त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क परिसरात सुरु असलेल्या हुक मी अप या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली ाहे. तेथून सात जणांना पकडले असून, पॉटस व वेगवेगळ्या फ्लेवरची तंबाखू व हुक्का ओढण्यासाठीचे साहित्य जप्त केले आहे. पार्लर चालवणारा वेदप्रकाश सुरेश वर्मा व साहित्य पुरविणारा अमिनुल इसुफ शेख (वय 21) यांना ताब्यात घेण्यात आली आहेत.
त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने वानवडी, भोसरी, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राज-रोसपणे सुरु असणार्या अवैध्य हातभट्टी, लॉटरी व जुगार अड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी तब्ब्ल 13 जणांना कारवाई केली आहे. विश्रामबाग परिसरात लॉटरी चालवणार्या तिघांना, तर वानवडीमध्ये सुरु असलेल्या मटका अड्यावर छापा टाकून चार जणांना पकडले आहे. तसेच भोसरी परिसरात जुगार अड्यावर छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे. तर, वानवडीत छुप्या पद्धतीने गावठी दारु लपवून विक्री करणार्यांवर कारवाई केली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वेगवेगळ्या पथकांकडून करण्यात आली.