आयुक्तांवर कारवाई करण्याची ‘अपना वतन’ ची मागणी
पिंपरी चिंचवड :
शहरात अवैध धंद्ये सर्रासपणे सुरु आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्या पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी अपन वतन संघटनेच्या वतीने शनिवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर निर्दशने करण्यात आली. तसेच अवैध धंद्याना पोलिस आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिध्दीकभाई शेख, राजेंश्री शिरवळकर, हमीद शेख, तौफीक पठाण, विशाल निर्मल, फतिमा अन्सारी, प्रकाश पठारे, हरिचंद्र तोडकर, गुलनार सय्यद, दिलीप दहिहाडे, अस्लम शेख यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.