शहादा,दि.24
शहरातील पहिल्या टप्प्यात निघालेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश भक्तांना सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन महाप्रसाद वाटप केले.
श्रीमती सावित्रीबाई बी.बंसल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शहादा व श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच शहादा शहर अग्रवाल समाजाचे अध्यक्ष राजेंद्रभाऊ (डिगीसेठ )अग्रवाल यांच्या सौजन्याने काल श्री विसर्जनाच्या पहिल्या टप्प्यातील मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाच्या समस्त गणेशभक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.महाप्रसाद वाटप कार्यक्रम नगर परिषद शहादा समोरच्या चौकात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्याच्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी स्वागत व कौतुक केले. या उपक्रम स्थळी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ जाधव, आरपीआय आठवले गट जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर,माजी नगरसेवक तेली समाज अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, ईश्वर पाटील, हिरालाल रोकडे, सल्लाउद्दीन लोहार, भाजपाचे शहराध्यक्ष विनोद जैन, सामाजिक कार्यकर्ते पिनाकिन पटेल, शिव छत्रपती ग्रुपचे विजुभाऊ चौधरी,लक्ष्मिकांत अग्रवाल, शासकीय बांधकाम व्यावसायिक विशाल गारोळे चौधरी मित्र मंडळाचे किशन चौधरी, भुपेंद्र चौधरी, पलाश चौधरी,मयुर चौधरी आदिंसह मान्यवरांनी महाप्रसाद वितरण कार्यक्रमात सहभागी घेतला. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार श्रीमती सावित्रीबाई बी. बंसल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र अग्रवाल, श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष यशवंतराव चौधरी यांच्यासह संचालक जगदीश अग्रवाल, मोहन अग्रवाल, शंकर अग्रवाल, रविंद्र अग्रवाल यांनी केला. श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर समितीचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष यशवंत चौधरी, सचिव जयेंद्र चव्हाण, विश्वस्त नरेंद्र परदेशी, लक्ष्मण बोरदेकर,सुनिल सप्रे, दिपक चौधरी, निलेश देवरे, ह्दयेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. राजेन्द्र अग्रवाल व यशवंत चौधरी यांनी आभार मानले.