नंदुरबार । शहरातील सर्व गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक लवकरच बोलवू आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मांडलेल्या सर्व मागण्यांवर आणि मुद्द्यांवर चर्चा करू, असे आश्वासन सोमवार 24 जुलै 2017 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीचे डॉ.नरेंद्र पाटील, श्री बाबा गणपतीचे सुनिल सोनार, भाऊ गणपतीचे वसंत सोनार, बंटी नेतलेकर, राम कडोसे, महाराणा प्रताप मंडळाचे चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत आदींचा सहभाग होता. े सर्वविभाग प्रमुखांसोबत फक्त गणेश मंडळांचा सहभाग असलेली बैठक या सप्ताहाअखेर आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले.
गणेश मंडळांची एकत्रित बैठक
23 जुलै रोजी सार्वजनिक गणेशोत्सवकाळात उद्भवणार्या विविध अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृतीसमिती प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांतर्गत शहरातील गणेश मंडळांची एकत्रित बैठक येथील तैलिक मंगल कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली होती. या बैठकीस शहरातील विविध गणेश मंडळांचे 110 पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चे अंती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना महामंडळाच्या वतीने निवेदन देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज देण्यात आलेल्या या निवेदनात सर्व गणेश मंडळांच्या वतीने मांडण्यात आलेल्या मागण्या करण्यात आले असून सर्व गणेश मंडळांनी शांततेचा भंग न करता कार्यक्रम आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.