शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

0

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात व रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.8 ) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होणार आहे.

महापालिकेने 1 मार्चपासून आठवड्यातून विभागनिहाय एकदा पाणीकपात सुरू केली आहे. ज्या भागांत बुुधवारी (दि.6) व शुक्रवारी (दि.8) पाणी बंद असते. त्यादिवशी त्या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन  पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.