मागील 16 वर्षांपासून सुरु असलेला उपक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात घरफोड्या आणि चोर्यांच्या प्रमाणात वाढ होते. यावर आळा घालण्यासाठी शहरातील नागरिक आणि तरुणांनी एकत्र येऊन पोलिसांना मदत करणे आवश्यक आहे. याच उद्देशातून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्यावतीने शहरातील नागरिक व तरुणांना एकत्र घेऊन शहरात ‘जागते रहो’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील तरुणांचा समूह दररोज रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत जागता पहारा देणार आहे. मागील 16 वर्षांपासून सुरु असलेल्या ‘जागते रहो’ उपक्रमाची यावर्षीची सुरुवात सोमवार (दि. 7) पासून करण्यात आली.
यावेळी पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, महिला पोलिस उपनिरीक्षक सीता वाघमारे, हवालदार बाळासाहेब शेलार, शिपाई कबीर पिंजारी, समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला राज्य अध्यक्षा अर्चना घाळी, जयेंद्र मकवाना, अमृत महाजनी, अमोल कानु, बाबासाहेब घाळी, अमित डांगे उपस्थित होते. शहरातील संभाजी चौक, संत ज्ञानेश्वर चौक, काचघर चौक, भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक, दुर्गानगर चौक, टिळक चौक, खंडोबा चौक, म्हाळसकांत चौक, बिग इंडिया चौक, हुतात्मा चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर चौक, चाफेकर चौक, केशवनगर चौक, चित राव गणपती चौक, मोरया गोसावी चौक, जुना जकात नाका चौक या प्रमुख चौकांमध्ये गस्त घालण्यात येणार आहे.
विभागासाठी स्वतंत्र विभाग प्रमुख
गस्त घालण्यासाठी शहराच्या रचनेनुसार काही विभाग करण्यात आले आहेत. विभागाला स्वतंत्र विभाग प्रमुख नेमण्यात आला आहे. त्यामध्ये प्राधिकरण विभाग-अमोल कानू, रुपीनागर विभाग-जयप्रकाश शिंदे, निगडी विभाग-जयेंद्र मकवाना), यमुनानगर विभाग-अमित डांगे, चिंचवड विभाग-बाबासाहेब घाळी, लिंक रोड विभाग-अमृत महाजनी, शरदनगर विभाग-राम सुर्वे, शाहूनगर विभाग-सतीश देशमुख, चिखली स्पाईन रोड विभाग-संदीप सपकाळ, रावेत विभाग-शिरीष कुंभार, आकुर्डी विभाग-उद्धव कुंभार, साईनाथनगर विभाग-विशाल शेवाळे, बिजलीनगर विभाग-लक्ष्मण इंगवले, गंगानगर विभाग-संतोष चव्हाण असे विभाग करण्यात आले आहेत. सर्व विभागांमध्ये मनोहर दिवाण, बळीराम शेवते, मदन जोशी, मंगेश घाग, अॅड. विद्या शिंदे, प्रवीण इथापे, राम सपाटे, संकल्प सुर्यवंशी, रवी बाफना, सुकेश येरूणकर, समीर पुराणिक, देवजी सापरिया, राजू येळवंडे, नितीन मांडवे, रामेश्वर गोहिल, कपिल पवार, अश्विन काळे, सतीश मांडवे, समीर चिले, राजेश बाबर, राहुल लुगडे आदी स्वयंसेवक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत
जागते रहो हा उपक्रम 16 जून पर्यंत सुरु राहणार आहे. उपक्रमात सहभागी होणार्या प्रत्येक स्वयंसेवकाला पोलिसांच्यावतीने ओळखपत्र, जर्किन, टी-शर्ट, शिट्टी व काठी देण्यात आले आहे. याच बरोबर ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. परिसरातील नागरिक या उपक्रमाचे स्वागत करीत आहेत, अशी माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.