शहरातील चिथावणीखोरांवर राहणार पोलिसांची करडी नजर

0

रावेर। शहराचा इतिहास लक्षात घेता प्रत्यक्ष घटनेची वास्तवता वेगळी असते. मात्र काही समाजकंटक, समाजविघातक चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक भावना भडकवीत असतात अशा व्यक्तींचा शोध पोलीस घेवून त्यांच्यावर योग्य कारवाई करतील यात कोणाचीही गय केली जाणार नाही अशा स्पष्ट सुचना रावेर पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी दिल्या. शांतता समिती प्रसंगी मनोगत व्यक्त ते बोलत होते.

बैठकीत यांची होती उपस्थिती
रमजान महिना सुरु असून त्याचे पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नगरसेवक आसिफ मोहम्मद, योगेश गजरे, शेख सादिक, शेख असदुल्ला खान, शारदा चौधरी, पार्वताबाई शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, हरीश गनवाणी, एम.ए. खान, कामगार नेते दिलीप कांबळे, पंकज वाघ, माजी नगरसेवक महेंद्र गजरे, शिरीष वाणी, लालचंद पाटील, कपिल दुबे, भोकरीकर, शैलेश अग्रवाल, शेख गयास, युसुफ खान, शेख आरीफ, डॉ शेख सत्तार, संतोष पाटील, एस.एस. सैय्यद, शेख महेमूद, प्रशांत श्रावक, पप्पू गीनोत्रा, भूषण महाजन, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी केले.

शांतता कायम राखा
यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले की, शहरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात मात्र काही वाईट प्रवृत्तींमुळे भावना भडकविण्याचे काम केले जात असून यामुळेच तणावाचे वातावरण निर्माण होत असते. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल देशमुख, जितू पाटील यांनी परिश्रम घेतले.