शहरातील चौपदरीकरणाचे काम जुलैअखेरपर्यंत सुरू होणार

0

जळगाव – शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जुलैअखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान हरीयाणाच्या जाण्डु कन्स्ट्रक्शनकडून हे काम केले जाणार असुन तीन ठिकाणी रोटरी जंक्शन (गोलाकार वर्तुळ) राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून शहरातुन जाणार्‍या महामार्गाचे विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबीत होता. त्यासाठी अनेक आंदोलने देखिल झाली. महामार्गाचे विस्तारीकरण नसल्याने अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. खासदार रक्षा खडसे व माजी खासदार ए.टी.पाटील यांच्यासह माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून शहरातील महामार्ग विस्तारीकरणाचा प्रश्न सोडविला. शहरातून जाणार्‍या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाची निविदा काढण्यात आली. सुमारे सत्तर कोटी रुपयांचे काम असलेल्या चौपदरीकरणाचे काम झांडू कन्स्ट्रक्शन कंपनी (हिरायाणा) ने घेतले आहे. कालिकामाता मंदिर ते खोटेनगर पर्यंत चौपदरीकरणाचे काम होणार आहे. गत महिन्यात टेंडर फायनल करून कंपनीला स्वीकृती पत्र देवून कामासाठी लागणारे फायनान्शिअल क्लोजिंग करण्याबाबत 30 मेस पत्र दिले आहे. त्या दिवसापासून साठ दिवसात आत पनर्फामन्स सिक्युरिटी म्हणून दहा टक्के भरण्यास सांगितले आहे. जुलै अखेरपर्यंत हे काम सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे काम एका वर्षातच हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
असे राहतील उड्डाणपूल
महामार्गाच्या चौपदरीकरणात महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल, गुजराल पेट्रोल पंप, खोटेनगर येथे उड्डाणपूल करण्यात येणार आहे. तर अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौकात रोटरी जंक्शन म्हणजेच गोलकार वर्तुळ राहणार आहे. याठिकाणी सुशोभिकरण करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे.