शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0

भुसावळ । शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर 21 रोजी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने तीन स्वतंत्र कारवाया करीत 66 जुगारींना गजाआड करीत 1 लाख 23 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़. दरम्यान या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे.

तीन अड्ड्यांवर धाड
मरीमाता मंदिराजवळील क्लबवर कारवाई करण्यात आली़. यामध्ये कृष्णा शिंदे यासह 13 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून 22 हजार 710 रुपयांची रोकड, सात मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली़. दुसरी कारवाई शहरातील सुभाष चौकीमागील शेख शकील यांच्या क्लबवर करण्यात आली़. शेख शकील यांच्यासह 29 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. 19 मोबाईल व दोन दुचाकी तसेच 32 हजार 85 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली़. तिसरी कारवाई जाम मोहल्ला, जमजम लॉज भागातील कालू शेख यांच्या क्लबवर करण्यात आली़ कालू शेख यांच्यासह 15 आरोपींविरुद्ध कारवाई केली़. 69 हजारांची रोकड, दहा मोबाईल व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक युवराज अहिरे, आशिष शेळके, नरेंद्र साबळे, हवालदार प्रदीप पाटील, प्रशांत चव्हाण, गुरूबक्ष तडवी, नंदलाल परदेशी, विनोद सपकाळे, दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.