शहरातील डांबरी रस्त्याचे झाले तीनतेरा

0

नवापूर। परिसरात झालेल्या व सुरू असलेल्या पावसाने शहरातील डांबरी रस्त्याचे चक्क बारा वाजवले आहेत. डांबरी रस्त्यावरील कपची, रेती निघून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. डबके साचुन सर्वञ चिखल पसरला आहे .वाहन चालक व रहिवाशांना यामुळे मोठे कसरत करावी लागत आहे. मच्छर व दुर्गधीशी सामना करावा लागत आहे. शहरात फेरफटका मारला असता नारायणपुररोड, शास्ञी नगर, सराफ गल्ली, दत्त मंदिर रोड, मंगलदास पार्क, कुंभार वाडा, शितल सोसायटी आदि भागात डांबरी रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे.

रस्त्यांची गुणवत्ता घसरली
काही रस्त्यांना बनवुन दोन तीन महिनेही झाले नसतील. त्या रस्त्यांनी ही आपले गुणवत्ता दाखवून दिली आहे. निकृष्ट कामाचा उत्कृष्ट पुरावा या पावसाने पोलखोल करून दिला आहे. असा आरोप विविध प्रभागातील रहिवासी करत आहेत. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक वाहने पडुन अपघात होत आहेत. अनेक जण जखमी ही झाले आहेत. विशेष करून राञीवाहन चालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन त्यात पडुन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शास्त्रीनगर व इतर भागात डांबरीरस्ते केले नसल्याने येथे चिखल तयार होऊन मोटरसायकली स्लिप होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यावर मुरूम टाकुन खड्डे बुजवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.