शहरातील दिक्षाभूमी प्रतिकृतीचा प्रश्‍न मार्गी लावा

0

जळगाव । शहरातील पिंप्राळा हुडको येथील गट नंबर 220 मध्ये तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन व नगराध्यक्ष शिवचरणभैय्या ढंढोरे यांनी नागपूर येथील दिक्षाभूमीची प्रतिकृतीचे भूमीपूजन केले होते. मात्र 20 वर्ष उलटून देखील अद्याप कोणतेही बांधकाम झालेले नाही. लवकरात लवकर या प्रतिकृतीचे बांधकाम करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी भारत अभियानच्यावतीने देण्यात जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक, सुरेश सोनवणे, सुनिल सुरवाडे, सुजाता ठाकुर, अनिल तायडे, मंगल भालेराव, दिपक सोनवणे, विनोद भालेराव, मुकेश सोनवणे, सचिन सोनवणे, भगवान मिस्त्री, गौतम सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे.