निवेदनाद्वारे ईसीएने केली मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचविणार्या छोट्या जाहिरातींवर आणि भिंतीवरील पत्रकांवर कारवाई करण्याची मागणी, पर्यावरण समितीने महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले असल्याचे समितीच्या विकास पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी पत्रके!
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर हे स्वच्छ शहर म्हणून विकसित होत आहे. स्वच्छ अभियान राबवून महापालिका शहरामध्ये स्वच्छता आणू पहाते आहे. शहरातील भिंतींवर, सार्वजनिक ठिकाणी, बसस्टॉप सर्वत्र सर्रासरपणे पत्रके लावली आहेत. परंतु, स्वच्छ शहराचे विद्रुपीकरण होत असताना प्रशासानांतील काही विभाग डोळे बंद करुन बसल्याचे दिसून येते. महापालिका आकाश चिन्ह विभाग फक्त फलकांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे ते छोट्या जाहिराती व भित्तीवरील पत्रकांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शहरातील सर्व मोकळ्या जागी पत्रके चिकटविलेली आढळत आहेत.
सौंदर्याला बाधा!
त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. त्यामुळे शहरातील छोट्या जाहिराती फलकांवर आणि भिंतीवरील पत्रकांवर करावी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी निवेदनातून केली आहे.