पुणे : शहरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे गेल्या आठवड्यापासून जोरदार कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी प्रथमच विभागाच्या एका परिमंडळातील कर्मचार्यांना दुसर्या परिमंडळात तैनात करण्यात आले आहे. या माध्यमातून विभागाच्या पाचही परिमंडळांमध्ये धडक कारवाईची मोहीम राबविली जात असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. या कारवाईसाठी प्रथमच एका परिमंडळातील कर्मचार्यांना दुसर्या परिमंडळात तैनात करण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक परिमंडळ स्तरावर एक अभियंता, एक विभागीय निरीक्षक, तीन अतिक्रमण निरीक्षक, तीस बिगारी कर्मचारी, चार ट्रक आणि पाच ते सात पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. या पथकांद्वारे दररोज दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ते व पदपथ मोकळे केले जात असल्याचे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
त्यामुळे कर्मचार्यांचे खच्चीकरण
अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांकडून पथकाची गाडी अडविणे, कर्मचार्यांच्या अंगावर धावून जाणे, धमकावणे असे प्रकार घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस फौजफाटा कमी पडत असून, कर्मचार्यांचे खच्चीकरण होत असल्याची खंतही बोलून दाखवली.
कारवाई सुरू असणारी परिमंडळे
नगररस्ता, येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील रस्ता (परिमंडळ-1)
औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता, कोथरूड-बावधन (परिमंडळ-2)
धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेगनर (परिमंडळ-3)
हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, कोंढवा-येवलेवाडी (परिमंडळ-4)
कसबा-विश्रामबागवाडा, भवानी पेठ, बिबवेवाडी (परिमंडळ-5)