पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील भैरवनाथ विद्यालयात 1998-99 साली इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 19 वर्षांनी एकत्रित येऊन माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करून आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे ही दहावी ’अ’ ची तुकडी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात पहिली संस्कृत विषय असणारी तुकडी होती. त्यामुळे या स्नेहमेळाव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले.
शिक्षकांसह सेवकाचा सत्कार
माजी विद्यार्थी अविनाश फुगे यांच्या पुढाकाराने शोभा राव, विनोद गव्हाणे, विजया ताम्हाणे, रणजित गव्हाणे, पराग मारणे, शीतल मारणे, प्रवीण गरुड, योगिता म्हस्के, रुपेश पुरळेकर, महेंद्र मिंडे, सोनाली मांजरे, विजय नाईकरे, प्रतिष्ठा मनसुख, विश्वास काशीद, मंजुषा शिंदे व अन्य सहकार्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाचा योग जुळून आला. या विद्यार्थ्यांनी प्राचार्य नागरगोजे, संस्कृत शिक्षक शिंदे, थोरात, बारगळ, गागरे, सासवडे, चौधरी, पांढरे, आहेर, शिपाई अर्जुन सदाकाळ यांचा सत्कार केला.