शहरातील फळ विक्रीचे दुकानातून 55 हजाराची रोकड लांबविली

0

गुजराथी गल्लीतील घटना ; तोंडाला रुमाल बांधलेले दोघे चोरटे सीसीटीव्ही कैद

जळगाव : खिडकीच्या लोखंडी आसर्‍या वाकवून प्रवेश करुन चोरट्यांनी 55 हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून तोंडाला रुमाल बांधलेले दोघे चोरटे दिसून येत आहे.

शहरातील कोल्हेनगर परिसरात प्लॉट नं. 37 गट नं. 61 पोर्णिमा बंगला येथे विजय भावलाल चौधरी (47) हे पती, मुलगा या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे गुजराथी गल्लीत श्री निहारिका फ्रुटस् असे दुकान आहे. सकाळी 09 ते सायंकाळी 07. 30 यावेळेत दुकान सुरु असते. शुक्रवारी सायकांळी 07.30 वाजता दुकानाच्या शटरला कुलूप लावून ते घरी निघून गेले.

ड्राव्हरमधून 55 हजाराची रोकड
शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता कुलूप उघडले नाही. त्यामुळे त्यांनी त्यात आईल टाकून पुन्हा उघडले असता कुलूप उघडले नाही. त्यानंतर त्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. ड्राव्हर तपासला असता त्यातील 55 हजाराची रोकड गायब होती. दुकानाच्या आतून असलेल्या भिंतीवरील खिडकीच्या लोखंडी आसारी वाकवून चोेरटे दुकानात शिरले. लाकडी ड्रॉवरचे लॉक तोडून गल्ल्यातील सुमारे 55 हजार रूपयांच्या रोकडवर चोरटयांनी डल्ला मारला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पहाटे 03.05 वाजता बॅटरीच्या उजेडात तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकलेला मुलगा दिसत आहे. 2.45 ते 4.30 वाजेपर्यंत चोरटे दुकानात असल्याचेही फुटेजवरुन स्पष्ट होत आहे.