शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले ड्रोनव्दारे

0

जळगाव । महापालिकेतर्फे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. यानुसार कंपनीने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मालमत्तांना क्रमांक देण्याचे देण्याचे काम हाती घेतले आहे. अंतिम टप्यातील सर्वेक्षण हे महापालिकेने ड्रोन’द्वारे केले असून आठ दिवसात शहरातील विविध ठिकाणांवरून 200 फुटांवरून मालमत्तांचे छायाचित्राद्वारे सर्वेक्षण केले आहे. येणार्‍या एप्रिल महिन्यापासून मालमत्ताकराचे नविन तसेच ऑनलाईन बिल नागरिकांना घर बसल्या बघता येणार आहे. महापालिकेच्या वसुली विभागातर्फे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम चार जानेवारीपासून स्थापत्य कॅन्सल्टन्स अमरावती या कंपनीच्या पन्नास जणांकडून सुरवात झाली आहे. पूर्वी सर्वेक्षण हे सॅटेलाइटद्वारे येणारे छायाचित्राद्वारे केले जात असे. परंतू सटेलाईटचे छायाचित्र अस्पष्ट येत असल्याने बांधकाम मोजतांना समस्या निर्माण होत होती. त्यानूसार कंपनीद्वारे 21 ते 29 जानेवारी दरम्यान शहातील विविध सहा ठिकाणांवरून ड्रोन’द्वारे छायाचित्रांद्वारे मालमत्तामधील वाढीव बांधकाम तसेच मालमत्तांचे सर्वेक्षण याद्वारे होणार आहे.

दोनशे फुटावरून ड्रोनद्वारे छायाचित्र
महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. शहरातील सहा ठिकाणांवरून ड्रोन 200 फुट आकाशात जावून मालमत्तांचे छायाचित्र घेतलेले आहे. त्यानुसार त्या क्षेत्रातील वाढीव बांधकाम तसेच मनपाकडे नोंदणी नसलेल्या नविन मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मालमत्ताकर सर्वेक्षणाच्या सुरू झालेल्या कामात शहरातील चार प्रभागांतील 37 वॉर्डांमधील सर्वेक्षणाचे काम हे आता अंतिम टप्यात आहे. त्यानुसार हद्दीचे मार्किंग करण्याचे काम देखील सुरू केले आहे. त्यात आधी मालमत्तांचे नंबर कुठल्या कुठे होते. या सर्वेक्षणातून एकाच रांगेने नंबरिंग देण्याच्याही काम जवपास पूर्ण झाले आहे. शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे महापालिकेचे सुरू असलेले कागदोपत्री काम सुरू होते. त्यात पाच ठिकाणी नोंदी करण्याचे काम करावे लागत होते. पण या डिजिटल सर्वेक्षणामुळे महापालिकेला मालमतेचा फोटो क्लिकवरून सर्व माहिती, मालमत्तांचे एका रांगेने क्रमांक लावता येईल.