शहरातील वाढत्या घरफोड्या, चोर्‍यांना आळा बसवा

0

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून शहरात चोर्‍यांच्या घटना शांत झाल्या होत्या. परंतू, आता पुन्हा चोरट्यांनी डोकेवर काढले असून तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी डल्ला मारीत जवानाच्या घरी घरफोडी केली. यातच त्या ठिकाणी अधिकारी देखील घटनास्थळी गेले नाही. त्यामुळे जवानाच्या घरी पोलिस अधिकार्‍यांनी भेट घ्यावी, यासह शहरातील वाढत्या चोरींच्या घटनांना आळा बसवाव्या यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे निवेदनात असे म्हटले आहे की, धार्मिक उत्सव, सण या दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाने समाधान कारक भुमिका बजावली.

चोर्‍या, घरफोड्या वाढल्या
शहरात चोर्‍या, घरफोड्या, दरोडे आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. तालुका पोलीस स्टेशनला लागुनच असलेल्या परीसरामध्ये घरफोड्या झाल्याने जनतेत घबराट पसरलेली आहे. सध्या कोणताही धार्मिक सण, उत्सव, निवडणुका व इतर कार्यक्रम नसल्यामुळे कोणताही अतिरिक्त बंदोबस्ताचा तणाव पोलीस प्रशासनावर नसतांना असे घडणे समर्थनीय वाटत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यातच मिरबाईनगरात झालेल्या जवानाच्या घरी चोरी झाल्यानंतर वरीष्ठ अधिकारी भेट देत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वरीष्ठ अधिकार्‍यांनी जवानाच्या घरी भेट देवून घटनेची माहिती घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.