अमळनेर । विकास कामे करतांना पदाबरोबर पत ही आवश्यक आहे. पत असेल तर पद महत्वाचे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी पत टिकवून ठेवणे ही मोठी जबबादारी राहते. तसेच जनतेने सन्मानाने दिलेले पद शोभेचे असू नये, असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मार्फत मंजूर झालेल्या ग्रामिण रस्ता कामाचे भूमिपूजन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले. शहापूर तालुका अमळनेर येथे हा सोहळा पार पडला पुढे बोलताना आमदार चौधरी म्हणाले की रस्त्यावरून गावाची प्रतिष्ठा व प्रगती कळत असते ज्या गावाला जाण्यासाठी रस्ते पक्के ते गाव सर्वच दृष्टिकोनातून अग्रेसर राहते यामुळेच गाव तेथे रास्ता हे अभियान आम्ही सुरु केले असून येत्या अडीच वर्षात एकही गाव पक्क्या रस्त्याविना राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कृउबा संचालक उदय पाटील, प्रा.अशोक पवार, किरण गोसावी, सुरेश पाटील, मनोहर पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत पाटील, भास्कर चौधरी, दीपक पाटिल, प्रवीण पाटिल, सरपंच एकतास साहेबराव पाटील, रमेश पाटिल, हभप भगवान महाराज, मच्छिद्र पाटिल, किशोर पाटील, गोवर्धन शिंदे, एस.एस. वायकोडे, विवेक पाटील, सी.एन.पाटील, नारायण कोळी, रमेश पाटील, हिरामण पाटील, सुदाम चौधरी, शरद साळूखे, विनोद चौधरी, बापु चौधरी, चंद्रशेखर साळुंखे, एम.के. पाटील, पंकज चौधरी, कल्याण पाटील, राजू महाराज, भागवत कोळी, माजी सरपंच शहापूर दिलीप पाटील आदी उपस्थित होते.