शहरातील समस्या सोडवा

0

पिंपरी-चिंचवड । भाजपचे पदाधिकारी विरोधी पक्षात असताना शहरातील समस्यांसाठी आग्रही होते. मात्र, मागील तीन वर्षांपासून केंद्रात भाजपचीच सत्ता असूनही आता भाजपचे पदाधिकारी शहरातील समस्यांबाबत ठोस निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचा विचार करत शहराच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली असून, तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करावीत, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचा प्रश्‍न सोडवावा, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करावे, पहिल्याच टप्प्यात मेट्रो पिंपरीपर्यंत न करता थेट निगडीपर्यंत करावी, रेडझोनचा प्रश्‍न निकाली काढावा, महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.