शहरातील साफसाफाईसाठी आरोग्य विभागाचा अ‍ॅक्शन प्लॅन

0

जळगाव-शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा मक्ता खासगी मक्तेदाराला आहे. शहरात प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 19 प्रभागात आरोग्य निरीक्षकाडून प्रभागातील स्वच्छतेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. लवकरच या सर्वेक्षणाला शहरात सुरवात होणार आहे.त्यासाठी आरोग्य विभागातर्फे अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त मिनीनीथ दंडवते यांनी दिली.

शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी खासगी मक्तेदाराला स्वच्छतेचा ठेका महापालिकेलेने दिलेला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून काम सुरू देखील सुरु आहे. परंतू शहरात अजून प्रभावी स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेचा सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार प्रभागात काय अमंलबजावणी करता येईल याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू आहे.

प्रभागानुसार तयार होणार अहवाल
शहरात 19 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील महापालिकेचे आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षकाला सर्वेक्षणाची जबाबादारी दिली जाणार आहे. प्रभागातील प्रत्येक घर, गल्लीतील स्वच्छतेच्या समस्यांबाबत तसेच किती कर्मचार्‍यांची आवश्यकता लागेल अशा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.

मनपा इमारतीत राबविणार स्वच्छता मोहीम
महापालिकेच्या प्रशासकीय ईमारतीत आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहिम लवकरच राबविली जाणार आहे. यासाठी प्रत्येक विभागामार्फत त्याच्या विभागाच्या कार्यालय व बाहेरील पॅसेज, बाथरूमच्या मदतीने स्वच्छता करण्यात येणार असल्याचे उपायुक्त दंडवते यांनी सांगितले.