शहरातील सामाजिक संस्थांतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

0

जळगाव । शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्यासह नागरिकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवदान करण्यात आले. तसेच सुभाषचंद्र बासे यांच्या विषयी माहिती देण्यात आली. गोदावरी फाऊंडेशनच्या जिल्हाभरातील सर्व प्रतिष्ठांनतर्फे देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

महावितरणतर्फे नेताजींच्या प्रतिमेस माल्यार्पण
महावितरणतर्फे अशोक साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी संजय आकोडे, राजेंद्र म्हंकाळे, प्रदीप पवार, धनंजय मोहोड, अमोल बोरसे, अरूण शेलकर, रामचंद्र वैदकर, विलास फुलझेले, जयेश हिवाळे, नितीन पाटील, अजय धामोरे, रविंद्र पवार, गिरिष चौधरी, नितीन महाजन, किशोर खोबरे, सिध्दार्थ लोखंडे, संदेश मानकर, मधुसुदन सामुद्रे, सचिन कोळी, राजेश अहेर, देवेश बाविस्कर, नितीन रामकुवर, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

रिपाइंच्या महिला आघाडी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शांती नारायण नगर येथे साजरी करण्यात आली. ‘तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी क्रांतकारी चळवळ देशासाठी करणारे नेताजी यांच्या प्रतिमेस डॉ. अभिजित पाटील, रमताई ढिमरे, अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सागर सपकाळ यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याबद्वल माहिती करून दिली. यावेळी लता वाघ, रेखा जाधव, अनीता पाटील, निलीमा वरणकर, पुजा कोळी, सागर पवार, ईश्‍वर चंद्र, दीपक पाटील, किरण सोनवणे, लक्ष्मण मरसाळे, किरण कोळी, नवल बाविस्कर, सागर धनुर्धर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भंगाळे विद्यालय
सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष विष्णु भंगाळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जितेंद्र सोनवणे, प्रिया सपकाळे, गुंजन मेढे या विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी भाषण दिले. याप्रसंगी मुख्यध्यापक नरेंद्र बोरसे, विजया चौधरी, अनुपमा कोल्हे, सचिन महाजन, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे आदी उपस्थित होते.

गोदावरी फाऊंडेशन
गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य व्ही. जी अराजपूरे, उपप्राचार्य प्रविण फालक,प्रा देवेंद्र मराठे,शशिकांत साळुंखे, किरण चौधरी, गौरव पाटील, विजय चौधरी इ सह कर्मचारी उपस्थीत होते. गोदावरी इंग्लिश मिडीअम स्कुल जळगाव,भुसावळ व सावदासह डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, संगीत महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवनावर आधारीत सजीव देखावा सादर केला.