धुळे (योगेश जाधव)। गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर सार्वजनिक मडळांनी भर दिला आहे. जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले जाणार आहे. लाडक्या गणरायाचे आगमनासाठी सर्वांचीच जोरदार तयारी सुरू आहे. विशेषत: सार्वजनिक मंडळांकडून योग्य नियोजन केले जात आहे. काही मंडळांनी मूर्तींच्या भव्य देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे, तर काही मंडळे सजीव देखावे सादर करण्यावर भर देणार आहे. यंदा 12 दिवस गणेशोत्सव आहे. त्यामुळे गणरायाची भक्ती करण्यासह देखावा सादर करण्यासदेखील 12 दिवस मिळणार आहेत.
सजीव देखाव्यांना पसंतीस्थानीक कलाकारांना संधी
भारत-चीन परिस्थिती, जीएसटी,नोटबंदी, व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणाई, मोबाइलचा अतिवापर, बेटी बचाओ ,पर्यावरण आदी विषयांवर देखावे सादर केले जाणार आहे. यामध्ये जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कलाकारांना घेऊन देखावा उभा केला जात आहे. यामुळे स्थानिक कलाकारांनाही कलागुण सादर करण्यास उत्सवाच्या माध्यमातून संधी मिळत आहे.
कार्यकर्त्यांची लगबग
मूर्तीच्या देखाव्यांऐवजी जिवंत देखावे सादर केले जात आहेत. आपला देखावा अधिक सरस व्हावा यासाठी देखाव्याचे कथानकावर अधिक अभ्यास केला जात आहे. कोणता देखावा असावा, किती पात्र असावेत, संवाद कोणते असावेत आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. पोलीस आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे खेटे घालावे लागत आहेत. जीएसटी,नोटबंदी आणि यंदा वर्गणीदेखील कमी मिळाली असल्याचे अनेक गणेशोत्सव मंडळांनी सांगितले आहे.
गणेश मंडळे आर्थिक अडचणीत
ज्वलंत विषयावर देखावे सादर करण्यावर मडळा कडून भर दिला जात आहे. यासाठी मंडळांनी देखाव्याच्या कॅसेट तयार करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी वेगवेगळे आवाजही दिले जात आहेत.सध्या मंडळाकडून शहरात ठिकठिकाणी मंडप उभारणीचे कामकाज सुरू आहे. शेड उभारणी, आकर्षक विद्युत रोषणाई , मडळाच्या बर्नरस अधिकची सजावटही केली जात आहे. एकदर गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोरील आर्थिक अडचणी वाढतच असल्याचे चित्र आहे.