महापौर राहुल जाधव यांचा पाहणी दौरा
पिंपरी चिंचवड : शहरातील महानगरपालिकेच्या काळेवाडी, रहाटणी, पिंपरीगाव, कासारवाडी व नेहरूनगर पिंपरी येथील स्मशानभूमि व दशक्रिया विधी घाटांना महापौर राहूल जाधव यांनी भेट दिली. शहरातील स्मशानभूमिमध्ये सेवा सुविधा पुरविण्याबाबत सूचना महापौरांनी अधिकार्यांना दिल्या. शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये अत्याधुनिक सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी महापौर यांनी सांगितले. यावेळी नगरसदस्या उषा वाघेरे, आशा शेंडगे, सुनिता तापकीर, निखिता कदम, नगरसदस्य संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, राहुल भोसले, सहाय्यक आयुक्त स्मीता झगडे, संदीप खोत, कार्यकारी अभियंता पी.पी. पाटील, संजय घुबे, देवन्ना गट्टूवार, फुटाणे उपअभियंता खडदरे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
नेहरुनगर येथे गॅस शव दाहिनी…
नगरसदस्य राहुल भोसले यांनी नेहरुनगर येथील स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिणी बसवण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी गॅस शव दाहिनी बसविण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्मशानभूमिची जागा आणि लगतचे डी.पी. रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन आर.सी.सी. स्मशानभूमी, डी.पी. रस्ते विकसित करणे, वृक्षारोपण करणे, घाटांची लांबी वाढविणे, स्मशानभूमी बेडची दुरूस्ती करणे, महिलांसाठी स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था, रस्त्यास साईडपट्टी मुरूम भराव करून रस्ता वाढविणे, वेटींग शेड आदी विकासकामे तातडीने करण्याबाबत महापौरांनी अधिकार्यांना सुचना दिल्या.