शहरातील स्मशानभूमींमध्ये विद्युतवाहिनी उपलब्ध करा

0

जळगाव । मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विविध विकास कामांसाठी दिलेल्या 25 कोटीच्या निधीतून 10 कोटींच्या निधीचे काम मंजूर झाले आहे. तर उर्वरीत निधी अजून बाकी असून या निधीतून शहरातील चारही स्मशनाभूमीत विद्यूत वाहिनी बसवावी अशा सूचना आमदार राजुमामा भोळे यांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली. यानुसार महापालिका प्रशासनाकडून कामाला सुरवात झाली असून अंदाजपत्र काढणे व निविदा प्रक्रिया राबविण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून अंदाजपत्रकाचे काम सुरू
शहरातील चार ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत मृत व्यक्तींवरील अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करावा लागत आहे. यामुळे नेरी नाका, शिवाजी नगर, पिंप्राळा व मेहरूण स्मशानभूमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढले आहे. या प्रदुषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच अंत्यविधीसाठी लाकडांचा देखील मोठा वापर करावा लागत आहे. यामुळे 25 कोटीच्या निधीतून 10 कोटीच्या कामांतून गटारीस इतर कामे होणार आहे. उर्वरीत निधीतून चारही स्मशानभूमीत विद्यूत वाहिनी उपलब्ध करावी अशा आशयाचे पत्र आमदार भोळेंनी 23 फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाकडे दिले आहे. दरम्यान, आ. भोळे यांच्या पत्रानुसार प्रशासनाने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. आ. भाळेंच्या पत्रानुसार विद्युत वाहिनीच्या अंदाजपत्रक काढण्यात येत आहे. अंदाजपत्रकपूर्ण झाल्यानंतर निविदा प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे विश्‍वासनीय सुत्रांकडून समजते.

पर्रावरणाचा र्‍हास रोखण्याची मागणी
25 कोटींच्या निधीतून 10 कोटींच्या कामांची निश्‍चिती झालेली आहे. मात्र, उर्वरीत निधीतून शहरातील चारही स्मशानभूमींमध्ये विद्युत वाहिनी उपलब्ध करण्याची सूचना आ. भोळे यांनी केली आहे. पर्यावरणाचा वाढता र्‍हास थांबविण्यासाठी विद्युत वाहिनी उपयुक्त ठरणार आहे. महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक वेळा स्मशानभूमीत लाकडे पुरवण्यासंदर्भांत विषय लावून धरण्यात आला आहे.