शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0

पुणे । वेश्याव्यवसाय करण्यासाठी मुंबईतून पुण्यात आलेल्या दोन नामांकीत मॉडेल तरुणींना गुन्हे शाखेच्या दक्षिण गुंडा स्कॉडने बालेवाडीतील ऑर्चिड हॉटेलसमोर पकडून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या मॉडेलला वेश्या व्यावसायासाठी घेऊन आलेल्या दोन महिला एजंटला पोलिसांनी अटक केली. यावेळी उझबेकिस्तान आणि रशिया या देशातून टुरिस्ट व्हिजावर आलेल्या आणि येथे वेश्या व्यावसाय करणार्‍या दोन तरुणींनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी मुंबईवरून पुण्यात येऊन चालविल्या जाणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी मधु रिकाडो स्मिथ (वय 58) आणि सोनिया जीवनलाल बधवाना (वय 42, रा. अंधेरी) या दोन महिला एजंटना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट ग्राहक बनून रचला सापळा
गुन्हे शाखेच्या दक्षिण गुंडा स्कॉडचे पोलिस निरीक्षक राम राजमाने यांना मुंबईतील दोन महिला एजंट मॉडेलिंग करणार्‍या तरुणी आणि परदेशी मुलींना घेऊन वेश्या व्यवसायासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बनावट ग्राहक तयार करून एजंट महिलांशी संपर्क साधत त्यांना बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड समोरील ब्रिजच्या खाली येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ येथे सापळा रचला. त्यावेळी एका कारमध्ये दोन महिला व एक तरुणी आली. त्यानंतर त्यांच्या पाठिमागे आणखी एका कारमध्ये तीन तरुणी आल्या. यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी छापा टाकत एजंट महिलांना ताब्यात घेतले. तर, तरुणींची त्यांच्या तावडीतून सुटका केली. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरूण वायकर, सहायक निरीक्षक शितल भालेकर यांच्या पथकाने केली.