जळगाव। शहरातील गोलाणी मार्केट तसेच सुदर्शन डायग्नोस्टीक सेंटर अशा ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरील गेल्याची घटना मंगळवारी घडल्या. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यासह शहर पोलिस ठाण्यात अज्ञाता चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटेनत, एसएमआयटी कॉलेज रोड परिसरातील रहिवासी आर.डी. शर्मा यांचे गोलाणी मार्केटमध्ये विभोर लॅमिनेशनचे दुकान आहे. सकाळी ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन (क्र एमएच.19. ए़ 9654) दुकानावर आले. जेवणाला जाण्यासाठी घरी जायला निघाले असता मार्केटमधील कुणाल फोटो या दुकानासमोर लावलेली त्यांची अॅक्टीव्हा ही दुचाकी आढळून आली नाही. यानंतर त्यांनी गोलाणी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री त्यांना झाली. यानंतर त्यांनी शहर पोलिसांना प्रकार कळविला. पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. तर दुसर्या घटेनत भगीरथ कॉलनी येथील रचना अनूप सोनवणे यांची मुलगी केतकी ही सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मोपेड दुचाकी (एमएच.19.सीके.1520) ने ढाके कॉलनी येथील शहास क्लासेस येथे क्लाससाठी आली होती. त्यामुळे तीन दुचाकी जवळच असलेल्या सुदर्शन डायग्नोस्टीक सेंटरच्या वॉलकंपाऊडलासमोर दुचाकी उभी करून क्लासला निघून गेली. सकाळी 8 वाजता क्लास सुटल्यानंतर केतकी हिला दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतर मिळून न आल्याने चोरीला गेल्याची तिला खात्री झाली. यानंतर आज बुधवारी रचना उनप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थेट पोलिस ठाण्यात आणली रूग्णवाहिका
जळगाव- शहरातील व्यापारी अशुतोष शेट्टी यांनी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी फ्लॅट खरेदीचा फेब्रुवारीत व्यवहार केला होता. पन्नास ते छप्पन्न लाखा पर्यंत हा फ्लॅट मिळून जाईल असे मध्यस्थी ऐंजट महिलेने शेट्टी यांना सांगीतल्या नुसार त्यांनी खरेदीसाठी पंधरा लाख रुपये तोंडी बोलीवर मुळ मालक कर्नल जैन यांच्या खात्यात वर्ग केले होते. मात्र पैसे दिल्यानंतर व्यवहाराची तफावत आणि शेट्टी यांचा अपघात झाल्याने व्यवहार पूर्ण होवु शकला नाही. दरम्यान शेट्टी यांनी जिल्हापेठ पोलिसांत तक्रारी अर्ज केला होता त्या अनुषंगाने आज कुणाल जैन पोलिस ठाण्यात दाखल झाले, आणि तक्रारदार अशुतोष शेट्टी दवाखान्यात असल्याने त्यांना थेट ऍम्बुलन्सनेच पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी दोघांचे म्हणणे एकून घेत त्यांची समजूत घातली.