शहरातून पाच मार्गावर शिवशाही बस

0

तुळजापूर, उमरगा, नाशिक, दापोली, चिपळूणला जाणार

पिंपरी-चिंचवड : राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारात शुक्रवारी सात शिवशाही बस दाखल झाल्या. यानंतर त्या तुळजापूर, उमरगा, नाशिक, दापोली, चिपळूण या पाच मार्गावर धावण्यास सुरूही झाल्या. बसमध्ये प्रवाशांना वातानुकूलित सुविधा, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था, मोबाइल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत. या बसची आसनक्षमता 43 एवढी आहे.

तुलनेत कमी दर
बसचे दर शिवनेरी बसच्या मानाने खूप कमी आहेत. त्यामुळे कमी दरात प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळणार आहे. तुळजापूर – 507 रुपये, दापोली – 386 रुपये, चिपळूण – 424 रुपये, नाशिक – 346 रुपये, उमरगा – 564 रुपये असे दर असणार आहेत. हिरकणी बस सेवेत व शिवशाही बससेवेच्या दरामध्ये वीस ते 40 रुपयांचे केवळ फरक आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ तीस ते चाळीस रुपये अधिक देऊन आरामदायी सुविधा मिळणार आहे.