जळगाव । शहरात अतिक्रमण मोहिम राबवित असतांना शिवाजी रोड येथील दुकानंदाराकडे प्लास्टीक पिशवी असल्याचा संशय आल्याने तपासणी केला असता त्या दोघा दुकानदारांकडून दंड आकरण्यात आला. यात पोलन पेठ, शिवाजी रोड वरील श्रीराम प्लास्टीक व शिव प्लास्टीक येथुन प्लास्टीक पिशव्या व चहाचे कप असे जवळपास 176 किलो माल जप्त करण्यात आला. या दुकानदारांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड करण्यात आला.
यावेळी भास्कर भोळे, प्रभाग अधिकारी सुशिल साळुंखे, शरद बडगुजर, एस. पी. अत्तरदे, ए. एन. नेमाडे, आरोग्य निरीक्षक के. के. बडगुजर, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान, अतिष राणा, संजय परदेशी , डॉ. कांबळे, दिनेश गोयर, गोडाळे, लक्ष्मी जावळे, आशा रानडे, रेहानाबी शेख, सुनिता सोनवणे असे सर्व आरोग्य, अतिक्रमण पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.