पीपल्स पीस फाउंडेशन, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातर्फे आयोजन
जळगाव- पीपल्स पीस फाउंडेशन आणि जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने दि. 4 व 5 मे 2019 रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जॉब फेअर फेस्टिवल 2019 या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यासाठी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मार्गदर्शन मिळत असुन फाउंडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी, सुरेश हसवानी, मनोज बियाणी ,किशोर ढाके, हेमंत कोठारी ,सचिन घुगे ,पंकज दारा ,सुनील पाटील ,आनंद गांधी, अमर खत्री , वर्धमान भंडारी, इम्रान शेख, प्रदीप वाघ , एम्लॉयमेंटच्या अनिसा तडवी मॅडम निलेश वाघ परिश्रम घेत आहेत. मेळाव्याविषयी अधिक माहिती प्रचिती मीडिया ,दुसरा मजला, सांची प्लाझा, बी. जे. मार्केटजवळ जळगाव येथे संपर्क साधावा.
अनेकांना मिळणार रोजगार
हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी सकाळी 10-30 ते सायं. 5-00 या वेळेत होणार्या या रोजगार मेळाव्यात अनेक उद्द्योग समूह सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये सोयो सिस्टिम्स, एस. के. ट्रान्सलाईन्स ,रॉयल फर्निचर ,मिम्स, बियाणी ग्रुप ,व्ही. पी. भंडारी, आर. जी. इंटरप्राइजेस ,धारा ऍडव्हायजरी सर्व्हिसेस, मारुती सुझुकी, सातपुडा आटोमोबाइल्स प्रचिती मीडिया, नवरंग टी, अमर डेअरी, लक्ष्मी ग्रुप ऑफ़ कंपनी व इतर अनेक कंपन्या, उद्योग समूहांचा समावेश असुन अनेक पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार दिला जाणार आहे.