शहरात उद्या कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

जळगाव । दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी शुक्रवार 3 मार्च रोजी सकाळी 10 वा. बालगंधर्व नाट्यगृह येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्याचे उद्घाटन महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ललित कोल्हे, मनपा स्थायी सभापती वर्षा खडके, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती कांचन सोनवणे, आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, सहाय्यक संचालक प्र.ग. हरडे आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात नामांकीत कंपन्यामार्फत 765 पदे अधिसुचित करण्यात आली असून उमेदवारांना पात्रतेनुसार नोकरी प्राप्त करता येईल. उमेदवारांनी येतांना आवश्यक कागदपत्रे- सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रति, 5 पासपोर्ट फोटो, बायोडाटा सोबत आणावे.