शिरपूर:शहरातील आणखी एकाचा अहवाल रात्री उशिराने मिळालेल्या कोरोना तपासणी अहवालात पॉझिटीव्ह आला आहे. अंबिका नगर येथील दोन तर खालचे बालाजी मंदिर येथील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. मात्र, रात्री उशिराने मिळालेल्या अहवालानुसार शिरपूर शहरातील पाटील वाडा परिसरातील ३८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले क्षेत्र लॉक केले असून या भागात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.शिरपूर शहरात नवीन चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील भूपेश नगर, काझी नगर, अंबिका नगर, खालचे गाव बालाजी मंदीराजवळ, दारू मोहल्ला, मारवाडी गल्ली हे भाग संपूर्ण सील करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या भागातील आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येऊ शकतो.या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी न.प.कडून प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.त्यांच्याशी संपर्क साधुन परिसरातील नागरिकांना घरपोच सेवा देण्यात येईल.तसेच शहरातील इतर भागात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या काळात सुरू राहतील.
प्रशासनाला सहकार्य करा
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे,आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, शहरातील कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा,सर्वेक्षण पथकांना खरी माहिती सांगा, लक्षणे आढळल्यास त्वरित काॅटेज हाॅस्पिटल, शिरपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आह