शहरात किराणा दुकान फोडले, काजू-बदामासह रोकडवर डल्ला

0

भुसावळ । शहरातील यावल रोडवरील जय नारायण प्रोव्हीजनचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा हजारांच्या रोकडसह महागड्या सिगारेटसह काजू बदामावर डल्ला मारत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिले. यावल रोडवरील साईचंद्र नगराच्या प्रवेशद्वारावरच महेश काबरा यांचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते दुकान बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडत दुकानात प्रवेश करीत ड्रावरमधील दहा हजारांच्या रोकडसह चिल्लर लांबवली तसेच एक किलो काजू व बदामासह महागड्या सिगारेटची पाकिटेही लांबवली. शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुकानाचे कुलूप तुटले असल्याचे या भागातील वॉचमनच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काबरा यांना माहिती कळवली. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.