शिरपूर शहरात चोरांचा धुमाकूळ:  एकाच रात्री चार दुचाकीची चोरी

0

शिरपूर: कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे. पण या काळात चोरट्यांनी शिरपूर शहरात मोठी क्रांती करीत एकाच रात्रीतून चार मोटारसायकली चोरून नेल्याचे समोर आले आहे
सविस्तर असे, शिरपूर शहरात २० रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी एकाच रात्रीतुन चार मोटरसायकली चोरून नेल्याने शिरपूरात चोरटे सक्रिय झाले असुन मोठी टोळी सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिरपूर शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर शिरपूर शहर तीन दिवस “कंटेनमेन्ट झोन” म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे शहरातील काही भाग वगळता इतरत्र दिवसभर शांतता बघावयास मिळत आहे. या संधीचा फायदा घेत शिरपूर शहरातील वरवाडे येथील व केशर नगर येथुन चार मोटरसायकली चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे
शिरपूर शहरातील वरवाडे येथे जयवंत बापू आणि सोनू (अशोक माळी ) यांची हिरो स्पेलंडर ब्लॅक कलरची मोटरसायकल (क्र.एम एच-१८बिजे- ७०४१, सोनू माळी) जयवंत बापू (एमएच १८-बिपी-७३४६)यांची मोटरसायकल चोरी झाली आहे. दूध डेअरी कॉलनीमागे केशर नगर येथील दोन मोटरसायकल चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोटरसायकल चोरी करणारे संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले आहे.सीसीटीव्हीमध्ये तीन ते चार संशयित असल्याचे दिसते.

पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे. मात्र, एकाच रात्रीत शहरातून चार मोटरसायकली चोरी करणाऱ्यांंचे मोठे रँकेट असल्याचे वर्तविण्यात येत आहे.