पिंपरी-चिंचवड : शहरात दडी मारलेल्या पावसाने आज(मंगळवारी) दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातारवण होते. परंतु, दुपारी तीनच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली.
या अगोदरही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, मान्सुनचे आगमन न झाल्याने पावसाची प्रतिक्षा लागून होती. मागील पंधरा दिवसात वातावरणात हवामानात बदल होत होते. मात्र, आज जोरदार हजेरी लावत वातावरणातही गारवा निर्माण झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस येत नसल्याने यंदा पाऊस लांबल्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र, दीर्घ काळ विश्रांती घेतल्यानंतर पाऊस बरसला आहे. त्यामुळे प्रतिक्षेत असलेले शहरावासीय सुखावले आहेत.