जळगाव । देशात वाढत्या दहशतवादातून घडणार्या घटनाचा निषेध म्हणून शहरात 21 मे रोजी दहशतवादा विरोधात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देशासाठी लढणारे सैनिक पोलीस दलातील कर्मचारी,पोलीस अधिकारी यांचे मनोबल वाढण्यासाठी राजकारण विरहीत असे मूक मोर्चा आयोजन करण्यात आले आहे. देशाचा हिताचा उपक्रम सर्वात आधी जळगाव जिल्ह्यात होत असल्याने विविध संघटना आणि संस्थाचा मोठ्या प्रमाणावर वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जळगाव जनता कर्मचारी हितवर्धक संघ,श्री क्षत्रिय अहिर शिंपी हितवर्धक संस्था, जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना जळगाव, जिल्हा बार असोएशनयासह जिल्ह्यातील संघटना आणि संस्थानी पाठिबा दर्शविला आहे. शहरातील गणेश तसेच दुर्गा मंडळे देखील मोठ्या प्रमाणावर सामील होणार आहे.