शहरात दोन ठिकाणी घरफोडी

0

जळगाव – शहरातील समता नगरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश करून ३५ हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी घडली तर दुसर्‍या घटनेत आदर्श नगरातील बंद घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र त्याठिकाणी काहीही न मिळाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान दोन्ही घटनेची रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, समता नगरात विमलबाई सोनार (वय-६०) हे एकटयाचा राहतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विमलाबाई या एकट्या झोपलेल्या असतांना चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत सुटकेसमध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोख व १० तोळयांच्या बांगड्या, ५ ग्रॅमची अंगठी व ५ ग्रॅमचे कानातले सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान आज सकाळी विमलबाई या झोपेतून उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र त्यांनी रात्री उशीरापर्यंत पोलिसात तक्रार दिलली नव्हती. चोरीच्या दुसऱ्या घटनेत आदर्श नगरातील रहिवासी अनिल शिंदे हे आपल्या कुटूंबियांसह पुणे येथे गेले आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांना घरात काहीच मिळू न आल्यामुळे चोरट्यांनी त्याठिकाणहून खाली हात परतावे लागले. दरम्यान आज सकाळी शिंदे यांच्या घराशेजारी राहणारे संजय चव्हाण यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजाची कडी कापलेली असल्याचे दिसताच त्यांनी अनिल शिंदे यांना फोन वरुन तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. परंतु घरातून काहीच चोरीला गेले नसल्याने याबाबत देखील पोलिसात रात्री उशीरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.