जळगाव-कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापौर भारती सोनवणे यांच्या पुढाकाराने मनपातर्फे शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तीन यंत्र दिले असून ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे.
देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाययोजना म्हणून निर्बंध लादले आहे. शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. गर्दी टाळण्यासाठी दि.14 एप्रिल पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहरात निर्जंतूकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तीन अत्याधुनिक यंत्र लावलेले तीन ट्रक्टर दिले असून बुधवारपासून निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे. शासकीय कार्यालये, बस स्थानक,रेल्वे स्टेशनसह सार्वजनिक ठिकाणी ब्लिंचीग आणि सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.