पिंपरी-चिंचवड : साहित्य संवर्धन समिती व पिंपरी-चिंचवड साहित्य मंचच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारी सोहळ्यामध्ये देहुरोड ते आकुर्डी या दरम्यान शहरातील साहित्यिकांचा प्रतिसाद लक्षणीय होता. या वारीमध्ये जय विठुचा नामघोष करीत या वारीमध्ये शहरातील साहित्यिकांनीही फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये आकर्षण होते ते तुकाराम महाराजांचा वेष परिधान केलेले प्रकाश घोरपडे हे लक्ष वेधून घेत होते. तर अण्णा जोगदंड यांनी पर्यावरणाचा संदेश देणारी वेषभूषा परिधान केली होती. त्यावर वृक्षतोड टाळा, जीवन वाचवा, नैसर्गिक संपत्तीचे जतन करा, असा संदेश दिला. तर गांधी टोपीवर जगदगुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावाचा उल्लेख असलेली बोध वाक्य लिहिली होती.
प्रबोधनपर फलक
तुकोबांच्या सोयर्यात विठु सावळा पहावा, रामकृष्ण म्हणोनिया एक वृक्ष तो लावावा, वहाँ न दोजख, भिस्त मुकामा, यहा ही राम, यही रहमाना, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, स्वच्छतेने करु, भारतमातेचे औक्षण, प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण असे फलक काही साहित्यिकांनी हातात घेत प्रबोधन केले होते. यावर्षीच्या वारीतील ही साहित्यिकांची वारी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
पालखीत यांचा होता समावेश
या पालखीमध्ये सुरेश कंक, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, प्रा. तुकाराम पाटील, सुहास घुमरे, संपत शिंदे, अशोक कोठारी, विनिता माने- पिसाळ, सुमन दुबे, माधुरी ओक, अश्विनी कुलकर्णी, माधुरी विधाते, पितांबर लोहार, मधूश्री ओव्हाळ, इला पवार बाबू डिसुझा, सुभाष चव्हाण, प्रा. रामचंद्र जाधव, अभिजीत काळे, हेमंत जोशी, कैलास भैरट, अंतरा देशपांडे, उमेश सणस, मुरलीधर दळवी, प्रकाश घोरपडे, नितीन हिरवे, आय.के.शेख, शोभा जोशी, मानसी चिटणीस, श्रीकांत चौगुले, तानाजी एकोंडे, अण्णा गुरव, बाळासाहेब घसते, रजनी राज अहेरराव, समृद्धी सुर्वे, दीपेश सुराणा अण्णा जोगदंड दादाभाई धनगर, गोरख चव्हाण, उज्ज्वला केळकर दिनेश भोसले, शामराव गायकवाड, प्रदीप बोरसे, मनिषा पाटील, नंदकुमार मुरुडे, सविता इंगळे, प्रज्ञा घोडके, अनिकेत गुहे, आनंदराव मुळजी, बी. एस. बनसोडे, पुरूषोत्तम सदाफुले, नितीन यादव, नंदकिशोर आवारी, नलिनी आवारी यांचा सहभाग होता.