जळगाव। प्रांताधिकार्यांनी जानेवारी महिल्यात हद्दपार केलेले दोन गुन्हेगार बेकायदेशीरपणे शहरात आढळुन आले. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणारे शेख हारून शेख इब्राहीम (रा.गेंदालाल मिल) व कैलास चंदु साबळे (रा.पिंप्राळा हुडको) या दोघांना 24 जानेवारी 2017 रोजी एका वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते.
प्रांताधिकारी यांच्या आदेशाने त्यांना हद्दपारीची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर दोघांना शहरातून बाहेर जावे लागले होते. दरम्यान, हे दोघे बेकायदेशीरपणे पुन्हा शहरात वास्तव्यास आले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विजयसिंग पाटील, संजय शेलार, अमोल विसपूते, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, वासुदेव सोनवणे यांच्या पथकाने दोघांना गेंदालाल मिल परिसरातून ताब्यात घेतले.