जळगाव– कोरोना विषाणूच्या उपाययोजनेसाठी लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात राज्याबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर अडकलेल्या विद्यार्थी किंवा मजुरांना येण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे. परंतु संबंधितांनी वैद्यकीय तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात नोडल अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मात्र शहरात येणारे नागरिक भीतीपोटी वैद्यकीय तपासणी न करता माहिती लपवून ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे माहिती लपवून ठेवणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा नोडल अधिकारी तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिला. दरम्यान, बाहेरुन आलेल्या नाग रिकांनी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.
मनपा हद्दीत किंवा जळगाव तालुक्यात परराज्यातून किंवा अन्य जिल्हायातून येणार्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी क रण्यात येणार आहे.त्यासाठी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात उपायुक्त संतोष वाहुळे,आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील,गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे,तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण,बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेकर यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. बाहेरुन आलेल्यांनी भोईटे शाळेत एम. जे. कॉलेज जवळ सकाळी 11 ते 5 यावेळेत वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.आणि प्रशासनाला सहकार्य करून दक्षता घ्यावी.नागरिकांनी बाहेरुन आलेल्यांची माहिती प्रशासनाला तात्काळ कळवावी. माहिती सांगणाऱ्याची नावे गोपनीय ठेवली जातील. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी तथा मनपा उपायुक्त संतोष वाहुळे मोबाईल क्रमांक-9922334478 यावर संपर्क साधावा.
जळगाव जिल्ह्यातून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात आली आहे. मनपा हद्दीत किंवा जळगाव तालुक्यात येणार्या प्रत्येक व्यक्त ी यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचे कोणत्याही प्रकारचे आजारा सारखी लक्षणे आढळून येत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक क रण्यात आले आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे आढळणार्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान,वैद्यकीय तपासणी करुन लक्षणे आढळल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मात्र काही जण शहरात येवून देखील वैद्यकीय तपासणी करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरात येणार्यांनी वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. शहरात आल्याबाबत माहिती लपवून ठेवू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा इशारा नोडल अधिकारी तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिला आहे.