जळगाव । बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे 28 एप्रिल रोजी भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याचवेळी मुला-मुलींसाठी ऋषी-मुनी, संत राष्ट्रपुरुषांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जयंती उत्सवासाठी परशुराम रथाच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. या यात्रेतील रथनिर्मितीचे काम श्रीकांत खटोड, सुरेंद्र मिश्रा, अशोक जोशी, संजय व्यास, गोविंद ओझा, संजय कुलकर्णी, पद्माकर नाईक, महेंद्र पुरोहित, राजेश नाईक यांच्या हस्ते सुरू झाले. सोमवारी ग्रामदैवत राम मंदिराचे गादिपती मंगेश महाराज जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते या रथाची पूजा करून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बहुभाषिक ब्राह्मण मंडळाचे पंकज पवनीकर, आनंद तिवारी, दिनेश तिवारी, नंदू उपाध्ये, आदित्य धर्माधिकारी उपस्थित होते. 23 ते 27 एप्रिलपर्यंत पाच दिवस रथ दररोज रात्री 8.30 वाजता शहरातील एका भागात फिरणार आहे.
मुलींचे स्वतंत्र ढोल पथक राहणार
23 एप्रिल रोजी गणेश कॉलनी, 24 एप्रिल रोजी बालाजीपेठ, 25 एप्रिल शिवाजीनगर, 26 एप्रिल रोजी अयोध्यानगर आणि 27 एप्रिल रोजी महाबळ कॉलनीत रथ फिरेल. 28 एप्रिल रोजी सायंकाळी वाजता श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा सुरू होईल. यात मुलींचे स्वतंत्र ढोल लेझीम पथक राहणार आहे. त्यात प्रत्येकी 60 जणींचा समावेश असेल. युवकांचेही पथक असणार आहे. ढोल वाजवण्याचे प्रशिक्षण कृष्णा सोनवणे अक्षय जोशी देत आहेत. वेशभूषा स्पर्धेत सहभागी होणार्या मुला-मुलींना विविध गटात बक्षिसे दिली जाणार आहेत. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विजया पांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून त्यांची प्रतिमेची शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार आहे.