शहरात मध्यरात्री 225 वाहनांची तपासणी 44 हिस्ट्रिशिटरांवर कारवाई

0

आगामी सण उत्सवांच्या पार्श्‍वभूमिवर कारवाई ; हॉटेल, ढाबे, लॉजची तपासणी ;15 वाहनांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी काळातील बकरी ईद व स्वातंत्र्य दिन याच्या पार्श्वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. यात तालुका पोलीस ठाण्यात 4, एमआयडीसी पोलीस ठाण्यात 19, शहर पोलीस ठाणे 5 व रामानंदनगर पोलीस ठाणे 16 असे एकूण 44 हिस्ट्रीशिटर तपासण्यात येवून कारवाई करण्यात लिी. तसेच यादरम्यान हॉटेल, ढाबे व लॉजचीही तपासणी करण्यात आली. तसेच विविध भागांमध्ये नाकाबंद करण्यात येवून वाहनांची तपासणी करण्यात आली. यात एकूण 225 वाहनांची तपासणी करण्यात येवून 15 वाहनांवर कारवाई करण्यात येवून 3 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बकरी ईद, स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी शनिवारी सायंकाळी शनी पेठच्या हद्दीत मॉकड्रील व एमआयडीसीच्या हद्दीत पथसंचलन झाले. त्यानंतर रात्री 12 ते पहाटे या वेळेत एमआयडीसी, जळगाव तालुका, जिल्हापेठ, शहर व शनिपेठ तसेच रामानंदनगर या पोलीस ठाणे हद्दीत आऊट ऑपरेशन राबविले. रात्रभर अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.

एमआयडीसी पोलीस ठाणे, 60 जणांना अटक
एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री तांबापुरा, मेहरुण, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, राम नगर, एमआयडीसी, अजिंठा चौक व इतर संवेदनशील परिसरात ऑल आऊट ऑपरेशन ही मोहिम राबविली. त्यात रेकॉर्डवर असलेल्या विविध 214 पैकी 86 आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली तर 60 जणांवर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. त्याशिवायरात्री 11 ते पहाटे 6 या वेळेत सात तास ही मोहीम चालली. त्यात फरारी, पाहिजे असलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर, टॉपटेप गुन्हेगार, माहित असलेले गुन्हेगार, बंदी फरारी व नॉन बेलेबल आरोपींची तपासणी करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर अशा आरोपींची संख्या 214 आहे. त्यापैकी रात्री 86 आरोपींची तपासणी करण्यात आली. नॉनबेलेबल 9, टॉपटेन 15, हिस्ट्रीशीटर 19 व इतर अशा 60 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. महामार्गालगत असलेले 4 हॉटेल्स, 2 ढाबे व 3 लॉजजीही संशयावरुन तपासणी करण्यात आली. त्यात विना सीटबेल्ट व विना परवाना वाहन चालविणार्‍या प्रत्येकी दोन अशा चौघांवर कारवाई करण्यात आली.

225 वाहनांची तपासणी
शहरातील गुजराल पेट्रोल पंप, कुसूंबा नाका, रेल्वे स्टेशन चौकी, सुभाष चौक , बहिणाबाई उद्यान, गणपतीनगर पोलीस चौकी, निमखेडी, पाँईट, कुसूंबा नाका, पत्री हनुमान मंदिर, सुभाष चौक, शिवकॉलनी या भागातील मुख्य रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये वाहनांचा होत असलेल्या वापरामुळे वाहनांचीही तपासणी करण्यात आली. यात शहरात सर्व ठिकाणी एकूण 225 वाहनांची तपासणी करण्यात येवून 15 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.