जळगाव। रविवारी 28 रोजी शहरासह विविध ठिकाणी क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंग यांची 477 वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी विविध संस्था, संघटना, शासकीय कार्यालये, महाविद्यालये सरसावले. महाराजाच्या कार्याला उजाळा देण्यासाठी जयंतीचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमाचे जयंती निमित्त आयोजन करण्यात आले. जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातुन महाराणा प्रतापसिंग यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
पोलीस अधीक्षक कार्यालय
महाराणा प्रताप यांची जयंती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील साजरी करण्यात आली. नवनियुक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते पोलीस महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
महाराणा प्रतापसिंग यांची जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रथम प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो जितेंद्र पाटील, पंकज लोहार यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कुस्ती स्पर्धा
शहरातील जाणता राजा प्रतिष्ठान व जळगाव जिल्हा कुस्ती तालिम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रविवारी 28 रोजी जाणता राजा व्यायाम शाळा येथे कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविलेल्या व नुकतीच डीवायएसपी म्हणून नियुक्ती झालेले विजय चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. खानदेशातुन कुस्तीपटू स्पर्धेसाठी आले होते.
महावितरण परिमंडळ कार्यालय
महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती विद्युत भवन जुनी औद्योगिक वसाहत येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रतापसिंग यांच्या कार्याची यावेळी माहिती उपस्थितांना देण्यात आली.