शहरात मोकाट कुत्र्यांचा आठ जणांना चावा

0

जळगाव । सध्या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून रविवारी आठ जणांना चावा घेतला. या आठ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. शहरासह तालुकाभरात झुंडीने भटके कुत्रे स्वैरपणे उच्छाद मांडत असतात. अनेकवेळा कुत्रे आडवा आल्याने गाडी पडून दुचाकीचालकांना किरकोळ जखमा होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, यावर अद्याप कोणतीही उपाययोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे

या जखमींचा आहे समावेश…
शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मोकाट कुत्र्यांनी शहरासह जिल्ह्यातील आठ जणांना चावा घेत लचके तोडले आहे. त्यात इम्रान अहमद पिंजारी (वय-27 रा.शनिपेठ), अयान खान अक्तर खान (वय-03 रा.गेंदालालमिल), समाधान त्र्यंबक नन्नवरे(वय-30 रा.पाळधी ता.धरणगाव), टापूर बर्‍हाटे (वय-10 रा. मायादेवीनगर), संजीवनी ज्ञानदेव टाकडे (वय-35 रा.रामेश्‍वर कॉलनी), रुपेश सैनी (वय-08 रा.वाघनगर), अंकुश रविराम चव्हाण (वय-08 रा. पोखरीतांडा ता.धरणगाव), सैयदा बी शेख मुनसी (वय-65 रा. कानळदा रोड), शांताबाई रामदास सोनवणे (वय-65 रा.राजाराम नगर) या जखमींचा समावेश आहे.

एकाला माकडाचा चावा
धरणगाव तालुक्यातील टाकरखेडा येथे तरूणास माकडाने चावा घेतला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. पांडुरंग मधुकर भिल (वय-30) याला सकाळी माकडाने चावा घेतला. यात तो जखमी झाल्याने सकाळी 11 वाजता त्याला जिल्हा सामान्य उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.