शहरात राजीव गांधी यांना अभिवादन

0

जळगाव। भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार 21 मे रोजी काँग्रेस जिल्हा कमिटीच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयात गरीब व गरजू रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकारी , कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जिल्हा काँग्रेस भवनात पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. ए.जी भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चोैधरी, मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, प्रदीप सोनवणे, दिपक सोनवने, राजेंद्र महाजन, डॉ.शोएब शेख, प्रल्हाद सोनवणे, रवि चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.