शहरात वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले; चालक फरार

0

जळगाव। शहरातील आंबेडकर मार्केट परिसरात विनापरवाना वाळु वाहतुक करतांना सोमवारी ट्रॅक्टर आव्हाणे तलाठी यांनी पकडले. दरम्यान, तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. सोमवारी सायंकाळी 7.10 वाजेच्या सुमारास विना परवाना वाळु वाहतुक करीत असतांना आव्हाणे येथील तलाठी मनोहर बाविस्कर यांना आढळला.

चालकाला परवानाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देत परवाना नसल्याचे सांगितले. तलाठी बाविस्कर यांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह 2 हजार रुपये किंमतीची 2 ब्रास वाळु ताब्यात घेतली. या दरम्यान, चालक तेथून फरार झाला. तलाठी बाविस्कर यांनी रात्रीच ट्रॅक्टरसह वाळु जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देत ट्रॅक्टरचालकाविरूध्द तक्रार दाखल केली असून अवैधरित्या वाळु वाहतुक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.