तळोदा । तळोद्यात मागील तीन ते चार महिन्यांपासून काळात येथील पालिकेच्या विकास कामांमूळे शहराला हडप्पा व मोहनजडो शहर सारखा प्रत्यय येतांना दिसत आहे. सर्वत्र खड्डेच दिसून येत आहे. तळोदा पालिकेच्या माध्यमातून खड्डे खोदतांना भारतीय दूर संचार निगमच्या केबल तुटल्याने अनंत अडचणी तळोदेकर सहन करत असतांनाच केबल तोडणे व केबल जोडणे एवढंच पोरखेळ सुरु असतांना मात्र स्वतः पालिकेची केबल जोडण्याचा विसर दुरसंचार विभागाला पडला असून विशेष म्हणजे तो खड्डा पुन्हा बुजवून वर काँक्रीट टाकलं गेलं असल्याची धक्का दायक माहिती समोर आली आहे.
शहरात प्रमुख बाजारपेठेत मुख्य गटार व जलशुद्धकरण प्रकल्पाची पाईप लाईन टाकले जात आहेत. यामुळे ठिकठिकाणी खड्डे खोदले जात आहेत. हे खड्डे जेसीबीद्वारे तयार होत असल्याने केबल पुन्हा पुन्हा तुटत आहेत. मात्र यावेळी जोडतांना यात पालिकेची केबल जोडण्याचा सोयीस्कर विसर पडल्याने मागील पंधरा दिवसापासून पालिकेचे जन्ममृत्यू दैनंदिन भरणा मागील पंधरा दिवसापासून बंद आहे. तसेच वसुली बाबत नियमित माहिती पाठवता येत नाही. मार्च अखेर सुरु असल्याने अनेक काम देखील ठप्प झाली आहेत. एकंदरीत सतत खड्डे करून दूर संचार निगमचा काम वाढवणारी तळोदा पालिकेच इंटरनेट वायर जोडणीस विसर पडला आहे.तळोदा पालिकेतर्फे विकास कामे हाती घेतले आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख बाजारपेठेत गटारी व जलशुद्धीकरणचे काम सुरु आहे. यांत पालिका प्रशासन व दूरसंचार निगम यांच्यात समन्वय नसल्याने काम सुरु झाल्यापासून तीन वेळेस जेसीबीद्वारे तीन चार वेळेस केबल तुटल्याने शहरातील बँका सह विविध ओंनलाईन काम खोळबंतात. मात्र तरी देखील कोणताच उपाय यावर शोधण्यास दोघ विभागांना अपयश आल्याच दिसत. शहरातील काकासेठ गल्ली दत्तमंदिर परिसर भागात पिण्याचा पाईप लाईन मधून अशुद्ध पाणी येत असल्याने पालिकेने नेमकं कारण शोधघेण्यासाठी खड्डे होत आहेत.
शहरात रस्ता असा नाही, जिथे खड्डे नाहीत. सर्वत्र खड्डेच खड्डे. त्यात वाहने धडकतात, धूळ उडते. वाहन चालकांची दमछाक होते. स्वत:ला सावरताना समोरून एखादे वाहन आले की अपघात होईल या भीतीने गाळणच उडते. शहराच्या जवळपास सर्वच भागातील हे चित्र आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने नुसत्या डागडुजीने काम होणार नाही. नव्याने रस्ते करणे हाच पर्याय आहे. परंतु काही ठिकाणी खडी घालून मलमपट्टी करण्याचे प्रकार दिसतात. त्याने तात्पुरती सोय नव्हे; उलट गैरसोय होत आहे.