जळगाव : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शरद पवार यांचा 76 वा वाढदिवस असून तो जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यानी एकत्र येऊन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला. त्यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम, एड्सग्रस्त मुलाना पोषण आहार किट, स्वेटर, कपडे वाटप करण्यात आले.
सेवादलातर्फे शाल,फळांचे वाटप
राष्ट्रवादी सेवालातर्फे शहरातील रेल्वे स्थानकावरील अपंग, अंध, भिकारी अशा बेघरांना शाली व फळे वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, वाय.एस.महाजन, सलीम इमानदार, अॅड.सचिन पाटील आदी पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
वैद्यकिय चमुतर्फे आरोग्य तपासणी
राष्ट्रवादी कॉग्रेस शहर कार्यालयात मुक्ति फांऊडेशनच्या मुकुंद गोसावी, डॉ. आनंद पाटील, डॉ. दिपक पाटील यांच्या वैद्यकिय चमुने आरोग्य तपासणी करुन त्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तपासणी करुन घेतली. तसेच यावेळी विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
एड्स ग्रस्तांना मदत
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडी राष्ट्रीय सचिव कल्पना पाटील, माजी शहराध्यक्ष मिनल पाटील व आधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार ईश्वर जैन, अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा बँकेचे संचालक रविद्र पाटील, विकास पवार, मंगला पाटील, यांच्या उपस्थितीत एड्सग्रस्त मुलांना पोषण आहार साहित्य, कपडे व स्वेटर वाटप करण्यात आले.