पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीकरीता अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे, यासाठी रविवार दि. 17 मार्चपासून सर्व मतदान केंद्रस्तरावर विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली आहे. ज्यांचे वय 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले आहे, ते मतदार म्हणून नाव नोंदणी करू शकतात. तसेच मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, रंगीत फोटो देणे, मतदार यादीतून नाव वगळणे इत्यादी कामासाठी रविवारी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी/ यादी अद्ययावत करण्याचे कामकाज चालणार आहे.
ऑनलाईन नोंदणी देखील सुरु…
पिंपरी / भोसरी / चिंचवड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी जवळचे मतदान केंद्र / इङज केंद्र जाणून घेण्यासाठी हीींिीं://सेे.सश्र/-ठर्8ीं4े या लिंकचा वापर करावा. ऑनलाईन नोंदणीसाठी ुुु.र्पीीिं.ळप (हेल्पलाईन 1950) येथे संपर्क करावा. तसेच अधिक माहितीसाठी व मदतीसाठी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी वर्षा सपकाळ, पिंपरी मतदारसंघातील नागरिकांनी कुलकर्णी व भोसरी मतदारसंघातील नागरिकांनी सौ. सावंत यांच्याशी संपर्क साधावा. मतदार नोंदणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो सर्वांनी बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.